E-Pass News : सतरा दिवसांत ‘ई-पास’साठी दीड लाख अर्ज, 55 हजारांहून अधिक अर्ज बाद

एमपीसी न्यूज – राज्यांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक ‘ई-पास’ मिळवण्यासाठी गेल्या सतरा दिवसांत तब्बल दीड लाख नागरिकांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी पंचावन्न हजारांहून अधिक ‘ई-पास’साठी आलेले अर्ज पुणे शहर पोलिसांनी बाद केले आहेत.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी बंदी घालण्यात आली असून, अत्यावश्यक कामानिमित्त प्रवासासाठी पोलिसांकडून ‘ई-पास’ मिळवणे आवश्यक आहे.

_MPC_DIR_MPU_II

या साठी गेल्या सतरा दिवसांत पोलिसांकडे दीड लाख नागरिकांनी अर्ज केले असून, त्यापैकी पंचावन्न हजारांहून अधिक अर्ज पुणे शहर पोलिसांनी बाद केले आहेत. तसेच, फक्त 22 हजार 597 अर्जदारांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच ई-पास दिला जात आहे. वैद्यकीय कारण, जवळच्या व्यक्तीचे लग्न अथवा अंत्यसंस्कार यासाठी परवानगी दिली जात आहे. मात्र, पाससाठी अर्ज करताना कोरोनाचा निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट जमा करणं बंधनकारक आहे.

‘ई-पास’ मिळवण्यासाठी नागरिकांना covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.