Pune News: राजगड किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना चक्कर आल्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज: किल्ले राजगडावर ट्रेकिंग साठी गेलेल्या एका व्यक्तीचा चक्कर येऊन खाली पडल्यामुळे मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली. दिलीप महामुनी (वय अंदाजे 60) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 27 नोव्हेंबर रोजी पाच जणांचा एक ग्रुप किल्ले राजगडावर ट्रेकिंग करण्यासाठी आला होता. शनिवारी रात्री मुक्काम केल्यानंतर रविवारी पहाटे ते राजगड किल्ल्यावर जात होते. दरम्यान काही अंतर पार केल्यानंतर दिलीप महामुनी हे लघुशंकेसाठी थोडे बाजूला गेले होते. बराच वेळ झाल्यानंतर ते परत न आल्यामुळे त्यांचे सहकारी त्यांना शोधण्यासाठी गेले असता ते खाली पडल्याचे दिसून आले.

बराच वेळ त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते उठले नाहीत. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.