Pune News : माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबास मिळकत करात शंभर टक्के सवलत

एमपीसी न्यूज – महापालिकेने शहरातील माजी सैनिक, शहिदांच्या पत्नी, तसेच शौर्यपदक विजेत्यांना दिलासा देत मिळकत करामध्ये शंभर टक्के सवलत दिली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, शहिदांच्या पत्नी, संरक्षण दलातील शौर्यपदक विजेते सैनिक यांना मिळकत करात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

या निर्णयानुसार महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी शहरातीलही माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, शहीदांच्या पत्नी, संरक्षण दलातील शौर्यपदक विजेते सैनिक यांना मिळकत करात सवलत देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता.

यासंदर्भात माजी सैनिकांनीही वेळोवेळी मागणी केली होती. त्यानुसार संबंधितांच्या एका सदनिकेच्या मिळकतकरात शंभरटक्के सवलत देण्यास सोमवारी झालेल्या स्थायीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.