Pune News : शंभर युनिट मोफत देण्याचा शब्द पाळावा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडी सरकारने ऐन लॉकडाऊन काळात वीज दरवाढी प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या माथी भरमसाठ बिलं हाणली. त्यामुळे शंभर युनिट मोफत वीज देण्याचा शब्द उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाळावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आजे केली.

पुण्यात एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदिश मुळीक आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी स्वत: वीजबीलं भरली आहेत, पण लोकांना बील भरू नका असे सांगत असल्याचा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत केला. त्यावर मत व्यक्त करत असताना पाटील म्हणाले, मुळात देवेंद्रजी शासकीय बंगल्यात राहतात. तर नागपूरच्या घराचे नुतनीकरण सुरू आहे. त्यामुळे या विधानाला काही अर्थ नाही.

मूळ मुद्दा हा आहे की शंभर युनिटपर्यंत वीजबील माफीची घोषणा तुम्ही केली. लॉकडाऊन काळातील वीजबिलात सवलत देऊ या घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राऊत यांनी केल्या होत्या. त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळावा हीच आमची मागणी आहे. वीजबील माफीसाठी आम्ही आंदोलन केल्यानंतर निर्णय घोषित करत नाहीत कारण त्याचं श्रेय विरोधी पक्षाला जाण्याची भिती सरकारला वाटते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.