Pune news : ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल विक्रेत्यांची चलती, राज्यात महिनाभरात 15 लाख मोबाईलची विक्री

एमपीसीन्यूज : मुंबई वगळता राज्यात दरमहा सरासरी 7  ते 8 लाख मोबाईल विकले जातात. कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळा आणि क्लासेस सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मेपासूनच मोबाईलची मागणी वाढली होती. जूनमध्ये मुंबई वगळता राज्यात 15  लाख मोबाईलची विक्री झाल्याची माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू सर्व काही सुरु होत गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळाही ऑनलाईनच्या माध्यमातून सुरु झाल्या. शाळा जरी ऑनलाईनच्या माध्यमातून सुरु झाल्या तरी पालकांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेसी व्यवस्था नव्हती.

मुलांचे शिक्षण तर महत्त्वाचे आहे म्हणून पालकांनी लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये हळूहळू जेव्हा दुकानं सुरु होत गेली तेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल खरेदी करण्यास सुरवात केली. याचा फायदा मोबाईल विक्रेत्यांना झाला असून राज्यात एका महिन्यात सर्वाधिक 15 लाख मोबाईल विक्री झाली आहे.

लॉकडाऊन अगोदर महिन्याला मुंबई वगळता राज्यात 8  ते 10  लाख मोबाईलची विक्री होत होती. पण ऑगस्टनंतर या व्यवसायात परत घट झाली असून आत्ता पुन्हा मोबाईल दुकानदारांना संघर्ष करावं लागत आहे. ऑनलाईन व्यवसायाचाही मोठ्या प्रमाणात फटका आम्हाला बसला आहे, अशी माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.