Viman Nagar News : ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिलेला 9.27 लाखांचा गंडा 

एमपीसी न्यूज – ऑनलाईन ऑफर देण्याचे बहाण्याने 1,499 रुपयांचे शूज खरेदी करायाला लावले तसेच शूज खरेदी केल्यामुळे फिर्यादी यांना आयफोन हँडसेट गिफ्ट जिंकल्याचं सांगून महिलेची 9.27 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमाननगर येथील महिलेसोबत 1 ते 23 जुलै दरम्यान ही घटना घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी विमाननगर येथील 47 वर्षीय महिलेने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक व बॅकेचे खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाईल व बॅकेचे खातेधारक यांनी संगनमत करुन फिर्यादी महिलेला ऑनलाईन ऑफर देण्याचे बहाण्याने 1,499 रुपयांचे शूज खरेदी करावयास लावले. फिर्यादी यांनी शूज खरेदी केल्यामुळे त्यानंतर फिर्यादी यांना आयफोन हँडसेट गिफ्ट जिंकल्याचे सांगुन, त्यांना गिफ्ट देण्याचे आमिष दाखवुन, जीएसटी इन्शुरन्स इत्यादिची कारणे सांगून, महिला आरोपी यांनी फिर्यादी यांच्या विविध बँकेच्या खात्यात एकुण 9 लाख 29 हजार 288 पाठवले. अशा प्रकारे महिलेची आर्थिक फसवणूक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.