Pune News : येत्या 8 फेब्रुवारीला ऑनलाईन मुख्य सर्वसाधारण सभा !

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यामध्ये महापालिकेची मुख्य सर्वसाधारण सभाच होवू न शकल्यामुळे अनेक महत्वाच्या विषयांवरचे निर्णय प्रलंबित आहेत. त्यामुळे येत्या 8 फेब्रुवारीला ऑनलाईन मुख्य सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेच्या मासिक मुख्य सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष नगरसेवक उपस्थित राहून घेता येत नाहीत. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी प्रत्यक्ष सभा घेण्यास राज्यसरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. महापालिकेने प्रत्यक्ष सभा घेण्यासंदर्भात अनेक निवेदने राज्य सरकारला पाठवली आहेत. मात्र राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही.

शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे आता सत्ताधारी भाजपने सर्वच विषयांवर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांच्या कार्यपत्रिका एकत्र करण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण सभेसाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयामध्ये मोठे टिव्ही बसवण्यात आले आहेत. तर महापालिकेत पदाधिकारी आणि महापौर कार्यालयामध्ये ऑनलाईन सभेची यंत्रण सज्ज करण्यात आली आहे.

त्यानुसार क्षेत्रिय कार्यालयामध्ये नगरसेवकांचे नियोजन क्षेत्रिय आयुक्तांकडे देण्यात आले आहे. ऑनलाईन सभेमध्ये मतदानाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुले आता महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन सर्वसाधारण सभा होत आहे. महापालिका प्रशासन, नगरसेवक आणि विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय या सभेत घेण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.