Pune News : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी गुरुवारी ऑनलाइन वेबिनार

एमपीसी न्यूज – जात प्रमाणपत्र पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया व नियम बऱ्याच अर्जदारांना माहिती नसते. सद्यस्थितीत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. नवीन प्रणालीचा वापर करुन अर्जदारांना जात प्रमाणपत्र पडताळणी करणे व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उद्या (गुरुवारी, दि. 25) ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या व्यक्तींना आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या प्रणालीचा वापर करुन जास्तीत जास्त अर्जदारांना जात प्रमाणपत्र पडताळणी करणे व सदर कार्यपद्धतीत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. झूम या ऑनलाईन मिटिंग ॲप्लिकेशनच्या माध्यमातून या वेबिनारमध्ये सहभागी होता येईल.

या प्रवर्गातील अर्जदारांनी ऑनलाईन वेबीनारमध्ये सहभागी होऊन जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य नितीन ढगे यांनी केले आहे.

झूम ॲप्लिकेशनसाठी लॉगीन आयडी –
मिटिंग आयडी : 84354254617
पासवर्ड : xB05YN

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.