_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : शहरात केवळ 1 हजार 722 जणांनी केला ‘होम अयसालेशन अ‍ॅप’ चा वापर

एमपीसी न्यूज – शहरातील तब्बल 50 हजार गृह विलीगिकरणातील बधितांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने विकसित केलेल्या अ‍ॅपचा बधितांकडून वापरच होत नसल्याचे समोर आले आहे. गृह विलीगिकरणातील बधितांना अ‍ॅपचा वापर बंधनकारक असून देखील केवळ 1 हजार 722 जणांनी ‘होम अयसालेशन अ‍ॅप’ चा वापर केला आहे.

गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांवर देखरेख करण्यासाठी महापालिकेने ‘अ‍ॅप’ तयार केले खरे, परंतु बहुतेक रुग्णांनी हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाउनलोडच केले नाही, तर ज्यांनी केले त्यापैकी निम्म्या रुग्णांनी ते अ‍ॅक्टिवच केले नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घरीच विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्यांची संख्या ही जवळपास 90 टक्क्याच्या आसपास आहे, अशा रुग्णांनी घरातून बाहेर पडणे अपेक्षित नाही. परंतु काही रुग्णांकडून या अटीचे पालन होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर ‘होम अयसालेशन अ‍ॅप’ डाउनलोड करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. परंतु, महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या माहितीनुसार 2 हजार 496 जणांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले, परंतु, त्यापैकी 1 हजार 722 जणांकडे ते अ‍ॅक्टिव असल्याचे दिसून आले आहे.

शहरात प्रतिदिन सापडणारे रुग्ण आणि प्रत्यक्षात हे अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता, बाधित रुग्णांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आसल्याचे समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.