Pune News: मुंबई SRA च्या धर्तीवर थकित भाडे बिलावर फक्त 8% व्याजदर आकारावा – सदानंद शेट्टी

एमपीसी न्यूज – थकित संक्रमण शिबिर सदनिका भाडे बिलावर 18% आणि 8% व्याज न आकारता मुंबई SRA च्या धर्तीवर थकित भाडे बिलावर फक्त 8% व्याजदर आकारावा, अशी मागणी पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी केली आहे.

शुक्रवारी (दि. 4 सप्टेंबर) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांच्यासोबत झालेल्या मीटिंगमध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष व सदानंद डेव्हलपर्सचे विकासक सदानंद कृष्णा शेट्टी यांनी इतर विकासकांसोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाकडून उपलब्ध इमारतींमधील संक्रमण शिबिरासाठी असलेल्या सदनिकांच्या भाडे आकारणीबाबत निवेदनपत्र सादर केले आहे.

सध्याच्या कोविड -19 या महामारी रोगाचा प्रादुर्भाव पाहता व बांधकाम व्यवसायातील मंदी पाहता एक मार्चपासून पुढील कालावधीसाठी संक्रमण शिबीर सदनिकांचे भाडे हे नाममात्र प्रति सदनिका रक्कम रु.1000/- आकारावे. ही भाडे आकारणी सहामाही पद्धतीने करावी. सध्याचा कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव तसेच गेले 4-5 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रामध्ये असलेली मंदी याचा सहानुभूतीपूर्वक आपण विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या टीडीआरला गेले 3-4 वर्षांपासून पूर्वीपेक्षा जवळजवळ 60% ने बाजार मूल्य कमी झाले आहे. त्यामुळे नियमावलीबाबतची शासन स्तरावरून स्पष्टता अजूनही झाली नसल्याने विकासकांना आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, याकडे निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

यावेळी सदानंद शेट्टी, सुशील पाटील, प्रताप निकम, समीर जाधव,  अजित बेलवलकर , उदयकांत आंदेकर अयाज खान हे व इतर विकासक सोबत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.