Pune News: हजारोंच्या उपजीविकेचे साधन असलेली मंदिरे उघडा – मंजुश्री खर्डेकर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटकाळी आता देवदर्शानासाठी मंदिर,मशीद, चर्च, गुरुद्वारा व अन्य प्रार्थनास्थळ उघडावीत जेणेकरुन नागरिकांचे आत्मबल वाढेल तसेच देवस्थाने उघडण्याचा निर्णय हा केवळ धार्मिक किंवा भावनिक नसून देवस्थाने असलेल्या गावांमध्ये हजारोंच्या उपजीविकेचे साधन ही बंद झाले आहे. याची दखल घेऊन शासनाने त्वरित सर्व देवस्थाने उघडावीत, अशी मागणी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केली.

​देवस्थानाच्या ​भोवती असणारे फूल विक्रेते, प्रसादाचे व पूजेचे साहित्य विकणारे, गुरुजी, सेवक यासह अनेकांचे पोट त्यावर अवलंबून असल्याने शासनाने निर्णय घ्यावा असेही त्या म्हणाल्या. देव दर्शनाने नागरिकांचे आत्मबल ही वाढेल व त्या मनोबलाच्या आधारे ते अधिक क्षमतेने कोरोनाच्या संकटाचा सामना करु शकतील, असे प्रतिपादनही मंजुश्री खर्डेकर यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध देवस्थानांनी पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी कोथरूड येथील दशभुजा गणपती मंदिर येथे आयोजित घंटानाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शहर चिटणीस प्रशांत हरसुले,संदीप खर्डेकर,स्वीकृत सदस्य ॲड.मिताली सावळेकर,मंडल उपाध्यक्ष राज तांबोळी,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे,कुलदीप सावळेकर,बाळासाहेब धनवे,रमेश पायगुडे,प्रतीक खर्डेकर,नितीन कंधारे,गौरीताई करंजकर,मंगलताई शिंदे,माणिकताई दीक्षित,सुवर्णाताई काकडे,ॲड.प्राची बगाटे,जयश्रीताई तलेसरा,संगीताताई आदवडे,श्री.व सौ.पारेख,मनिषा पायगुडे, सुवर्णा शिंदे, सुनिता अवसरे ,अनिता लंगोटे ,उषा पवार ,नयना जगताप ,मीना कोंडे,मीनाक्षी स्वामी,मेघना ववले, आराध्या तनपुरे,मंगल जाधव यांच्या सह अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

वा रे उद्धवा अजब तुझे सरकार, असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशी जळजळीत टीका पुणे शहर चिटणीस प्रशांत हरसुले यांनी केली. या सरकारच्या उफराट्या आणि तीनही पक्षांच्या परस्परविरोधी कारभारामुळे एक ना धड भाराभर चिंध्या, अशी अवस्था असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.

एसटीतून प्रवासाची परवानगी तर स्वतःच्या चारचाकीतून कुटुंबीयांना घेऊन प्रवास करायला बंदी या तिरपट निर्णयामुळे सरकार नेमके काय करु इच्छिते तेच समजत नाही असेही संदीप खर्डेकर यांनी सांगितले. यावेळी ॲड. मिताली सावळेकर, गौरीताई करंजकर व राज तांबोळी यांनीही आपल्या भाषणातून सरकारच्या उलटसुलट निर्णयांवर टीका केली. तसेच आता सर्व धार्मिक स्थळे उघडल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा ही सर्व वक्त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.