Pune News : सीओईपीच्या ‘झेस्ट’ महोत्सव अंतर्गत सायक्लोथॉन आणि मॅरेथॉनचे आयोजन

एमपीसी न्यूज : सीओईपीच्या झेस्ट महोत्सव (Pune News) अंतर्गत सायक्लोथॉन आणि मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. COEP Tech मधे आयोजित विविध महोत्सवांपैकी ZEST एक क्रीडा महोत्सव आहे. देशातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या या महोत्सवाची तयारी अत्यंत उत्साहात सुरू झाली आहे. त्यातील साइक्लोथॉन आणि मॅरेथॉन या इव्हेंटसचे आयोजन अनुक्रमे 31 डिसेंबर आणि 8 जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
मॅरेथॉन –
जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे ही मॅरेथॉन पूर्णपणे विद्यार्थी नियोजित आहे. COEP Tech युनिव्हर्सिटीच्या मैदानातून सुरुवात होणारी ही मॅरेथॉन पहाटे 5 वाजता सुरू होईल. प्रामुख्याने मॅरेथॉनमध्ये 4 प्रकार असून त्यात तीन किलोमीटर, पाच किलोमीटर, पाच किलोमीटर (कॉर्पोरेट) आणि दहा किलोमीटर यांचा समावेश आहे. यासाठी नोंदणी शुल्क आहे. तसेच विजेत्यांना 1 लाख रुपये पर्यंतची रोख बक्षीसे जिंकण्याची संधी आहे.
साइक्लोथॉन –
31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली सायक्लोथॉन ही पूर्णपणे विद्यार्थी नियोजित आहे. पहाटे 5.30 वाजता COEP Tech युनिव्हर्सिटीच्या मैदानातून या साइक्लोथाॅनचा प्रारंभ करण्यात येईल. साइक्लोथाॅनमध्ये 15 किमी, 30 किमी असे दोन प्रकार आहेत. तसेच, यासाठी नोंदणी शुल्क आहे. साइक्लोथॉन आणि मॅरेथॉनची नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने https://www.coepzest.org/ येथे सुरू झाली आहे.