Pune News : भारतीय विद्या भवनमध्ये ‘कीर्तन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या (Pune News )सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कीर्तन संवाद ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 30 मार्च 2023 रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’ चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

 

Chakan News : वीज पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून महावितरणच्या दोन कर्मचार्यांवर लोखंडी रॉडने हल्ला

 

मधुश्री शेंडे आणि अवनी परांजपे हे बाल कीर्तनकार श्रीराम नवमी,रामदास जयंतीनिमित्त कीर्तन संवाद सादर करणार आहेत. श्रीमती अंजली कऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून आशुतोष परांजपे(हार्मोनियम),केदार तळणीकर(तबला) हे साथसंगत करणार आहेत.
‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार (Pune News ) कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 156 वा कार्यक्रम आहे .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.