Pune News : समता पर्वच्या निमित्ताने संविधान विषयक व्याख्यानाचे अयोजन

एमपीसी न्यूज : समाज कल्याण विभागामार्फत (Pune News) राबविण्यात येणाऱ्या ‘समता पर्व’च्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे कार्यालयामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये जालिंदर कांबळे यांचे ‘अनुसूचित जाती उत्थान दशा व दिशा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

संविधान विषयक व्याखानांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला समाज कल्याण विशेष अधिकारी मल्लिनाथ हरसुरे, समाज कल्याण अधीक्षक नंदकुमार राणे उपस्थित होते.

Pune News : मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर

कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील (Pune News) वंचित व दुर्बल घटकांसाठी विविध चळवळींच्या माध्यमातून कार्य केले. त्यांनी भारतीय संविधानामध्ये समाजातील वंचित व दुर्बल घटकांसाठी तसेच देशातील सर्वसामान्य नागरीकांना हक्क व अधिकार मिळावेत म्हणून लिखित तरतुद करुन ठेवली आहे. अनुसूचित जाती जमाती व इतर जाती, समाजातील वंचित व दुर्बल घटकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात असून त्यांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज कल्याण विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.