Pune News : 21 व्या पिफ अंतर्गत सहा दिवस व्याख्यानमालेचे आयोजन

एमपीसी न्यूज – 21 व्या पीफ अंतर्गत 3 ते 8 फेब्रुवारी या सहा दिवसाच्या कालावधीत चित्रपबटसृष्टीशी निगडीत विविध विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात (Pune News) आले आहे. यामध्ये दिग्दर्शक, अभिनेते , अभिनेत्री हे त्यांचे विचार अनुभव मांडणार आहेत

पहिल्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता  ए श्रीकर प्रसाद यांचे ‘दी इंव्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग’ या विषयावर व्याख्यान होईल. तर उद्या शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता चैतन्य ताम्हाणे हे विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावर भाषण करतील.

Pimpri News : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी महिन्यात सात टोळी प्रमुखांसह 110 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

रविवारी दुपारी  साडे तीन  वाजता दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर शाजी करून हे ‘थिंकिंग इमेजेस’ याविषयावर मार्गदर्शन करतील. सोमवारी (दि.6)  दुपारी साडे तीन वाजता ‘अर्जुन पंडित’, ‘और प्यार हो गया’, ‘अंजाम’, ‘जो बोले सो निहाल’ यांसारख्या चित्रपटांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांचा ‘मेनस्ट्रीम सिनेमा टूडे’ या विषयावर मास्टरक्लास होईल. याबरोबरच ‘राज कपूर: दी मास्टर अॅट वर्क’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील संपन्न होईल.

त्यानंतर मंगळवारी (दि.7) दुपारी साडे तीन वाजता सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर हे ‘ह्युमर इन सिनेमा’ याविषयावर आपले विचार मांडतील. तर बुधवारी (दि.8)  दुपारी साडे तीन वाजता ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे व टाटा इन्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ मिडीया अँड कल्चरल स्टडीज विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. लक्ष्मी लिंगम या दोघी ‘मेकिंग फिल्म्स अँड वॉचिंग फिल्म्स: जेंडर इन हिंदी सिनेमा’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

यानंतर सायंकाळी साडे चार वाजता सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Pune News) या ‘चॅलेंजेस ऑफ फिमेल अॅक्टर्स इन दी एन्टरटेन्मेट वर्ल्ड’ या विषयावर आपले मत मांडतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.