Pune News : भटक्या विमुक्त समाजाच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन

एमपीसी न्यूज – पारधी, कोल्हाटी आणि तत्सम भटक्या विमुक्त समाजाच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, पुणे आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने ‘ओळखीचा आधार’ याविषयी चर्चासत्र घेण्यात आले.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’, चिंचवड येथे हे चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’चे पद्मश्री गिरीश प्रभुणे, जिल्हाविधि सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत, स्थायी लोकन्यायालय, पुणे जिल्हा न्यायालयचे सदस्य रवींद्र बिडकर, विधिज्ञ सतीश गोरडे, विधिज्ञ सुहास पडवळ हे उपस्थित होते.

या चर्चासत्रातील निष्कर्षांच्या आधारे गरजूंना शक्य ती सर्व मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टविश्वस्त विधिज्ञ नंदिनी शहासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.