Pune News : शारीरिक शिक्षण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा सायकल रॅली’चे आयोजन

एमपीसी न्यूज: शारीरिक शिक्षण दिवसानिमित्त माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत ‘माझी वसुंधरा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 24 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता या सायकल रॅलीला सुरुवात होणार असून या रॅलीचा समारोप धायरी येथे होणार आहे.

ही रॅली सनसिटी रोड, आनंद नगर ते माणिकबागमार्गे धायरी अशी असणार आहे.

यावेळी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पुणे मनपा सहाय्यक आयुक्त माधव जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, प्रशिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. पी. एन. कदम, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, अभिनेत्री स्मिता गोंदकर, संतोष चाकणकर, मनिष जगदाळे उपस्थित असणार असल्याची माहिती माय अर्थ फाऊंडेशन अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली आहे.

पर्यावरणासाठी आणि स्वत:च्या शारिरीक आरोग्यासाठी जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी व सायकलप्रेमींनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.