Pune Crime News : कोंढव्यात चुलतीला शिव्या दिल्याच्या रागातून एकावर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – तीन महिन्यांपूर्वी चुलतीला शिव्या दिल्याच्या रागातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कोंढव्यातील काझी चौकात शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

याप्रकरणी मोहसीन गालिफ सय्यद (वय 28, रा. भाग्योदय नगर, मक्का मस्जिदजवळ, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. अरबाज शेख, शहनवाज शेख (वय 22), सय्यदअली उर्फ कुरेशी उर्फ गुटऱ्या (रा. कोंढवा, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीने तीन महिन्यांपूर्वी आरोपी अरबाज शेख याच्या चुलतीला शिव्या दिल्या होत्या. याचा राग मनात धरून आरोपी अरबाज शेख याने इतर साथीदारांच्या मदतीने फिर्यादीवर हल्ला चढवला. ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारला. परंतु फिर्यादीने तो चुकवला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला कपडे काढून बेदम मारहाण केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मधाले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.