Pune News : शहरी भागात लोकसहभागातून ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहीजे : खा.वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज : जागतिक तापमान वाढीचे संकट लक्षात घेवून शहरी भागात ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहिजे, असे मत राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

त्यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या ‘युथ कनेक्ट’ या उपक्रमा अंतर्गत आज रविवारी सकाळी 7 वाजता बाणेर येथील तुकाई टेकडी वरील जैवविविधता उद्यानाला त्यांनी भेट दिली. युथ कनेक्टच्या तरुणांना वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून चालू आसलेल्या वृक्ष लागवड व संगोपनाची माहिती व्हावी या उद्देशाने ही भेट आयोजित केली होती.

यावेळी त्यांनी वसुंधरा अभियाना अंतर्गत केलेल्या कामाचे कौतुक केले. या भेटीच्या वेळी त्यांचे समवेत बी.व्ही.जी. ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड हे देखील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

वसुंधरा अभियानाचे पांडुरंग भुजबळ, आप्पासाहेब पोकळे, संजय मुरकुटे व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित तरुणांना विविध वृक्षांची व टेकडीवर चालू असलेल्या पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली.

यानिमित्ताने खासदार चव्हाण आणि हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते वसुंधरा अभियानच्या सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी बाबुराव चांदेरे, सुषमा निम्हण, डॉ.सुनिल जगताप, नितीन कळमकर तसेच युथ कनेक्टचे सुशांत ढमढेरे, महेश हांडे, राकेश कामठे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी स्वागत सुषमा सातपुते यांनी केले तर युथ कनेक्टचे अध्यक्ष राहुल पोटे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.