Pune News : 33 वर्षीय महिलेचा शोध लागावा यासाठी आईवडिलांचे उपोषण सुरू

एमपीसी न्यूज – जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या 33 वर्षीय महिलेचा शोध लागावा, यासाठी या महिलेच्या आईवडिलांनी गुरुवार (दि. 24 सप्टेंबर) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, सुजित यादव, अजय लोंढे, अनिता साळवे, संतोष डंबाळे यांनीही पाठिंबा दिला आहे.

जम्बो कोविड सेंटर बाहेर हे उपोषण सुरू आहे. रागिणी गमरे आणि सुरेंद्र गमरे यांची मुलगी प्रिया तानाजी गायकवाड (वय 33) या हरविल्या आहेत.

जंबो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत बेपत्ता महिलेच्या आईवडिलांनी आजपासून जम्बो कोविड सेंटर बाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषण आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेले आहे. 29 ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ससून हॉस्पिटल मार्फत शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या महिलेविषयी उलटसुलट माहिती देऊन खरी माहिती दडवून ठेवली आहे.

अजूनही ही महिला आढळून येत नसल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. याबाबत मुलगी ॲडमिट आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे वेळोवेळी सांगून डिस्चार्जच्या वेळेला मात्र मुलगी आमच्याकडे ॲडमिट नाही, असे सांगून फसवणूक करणे, जम्बो कोविड केअर प्रशासनाच्या निषेधार्थ उपोषण सुरू आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.