Pune News: खाजगी शाळांच्या मनमानी विरोधात पालक रस्त्यावर, फीमध्ये सवलतीची मागणी

एमपीसी न्यूज – खाजगी शाळांकडून होणारी अवाजवी शुल्कवाढ, फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकणे, फी न भरल्यास ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे, खाजगी शाळांच्या या अशा प्रकारच्या कृती विरोधात पुण्यात आज पालक रस्त्यावर उतरले होते.

_MPC_DIR_MPU_II

शुल्क नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी या पालकांनी आज केली. पुणे पेरेंट्स युनायटेड या पालकांच्या मंचातर्फे पुण्याच्या बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आले.

Covid-19 मुळे सध्या संपूर्ण देश आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत खाजगी शाळा पालकांना विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरण्यासाठी दबाव टाकत आहे. शाळा बंद असतानाही संपूर्ण फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केली जात आहे. आणि ही भरली नाही तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात ब्लॉक करण्याचे प्रकारही काही शाळांकडून करण्यात आले आहेत. खाजगी शाळांच्या याच मनमानी कारभाराविरोधात पुणे पेरेंट्स युनायटेडने हे आंदोलन केले.

खाजगी शाळांच्या प्रश्नासंदर्भात शासनाची भूमिकाही वेळकाढूपणा असल्याचा आरोप पुणे पेरेंट्स युनायटेडचे मुकुंद किर्दत यांनी केला.

ते म्हणाले, शाळा बंद असल्यामुळे वाहतुकीचा, देखभालीचा, प्रयोगशाळेचा, जिमखाण्याचा, भोजनाचा असे अनेक खर्च वाचले आहेत. मग असे असताना पालकांनी पूर्ण शुल्क का द्यायचे, काही शाळांमध्ये तर 50 ते 60 टक्के खर्च हा इतर सुविधांचा असतो. या सर्वांचा विचार करून शाळांनी शुल्कामध्ये कपात करणे अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.