Pune News: पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टमध्ये पक्षनेत्यांचा समावेश नाही

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्या, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख यांची न्यासाचे सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये पक्षनेत्यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे पदाधिकारी, विरोधी पक्षनेत्या व महापालिकेचे अतिवरिष्ठ अधिकारी यांचा ट्रस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.

वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्ष साकारण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मान्यतेचा अर्ज मागील आठवड्यात मुंबईत वैद्यकीय शिक्षक संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, नाशिक या संस्थेकडेही हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

महाविद्यालयाची प्रक्रिया निर्णायक स्थितीमध्ये आली आहे. गुजरातमधील अहमदाबाद महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर पुणे महापालिकेचा न्यास (ट्रस्ट) स्थापन करण्यास महापालिकेच्या मुख्यसभा राज्य शासनानेही मान्यता दिलेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालय व एमसीआयची मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तत्पूर्वी डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स, नाशिक यांच्याकडून एक पथक पाहणीसाठी पुण्यात येणार आहे.

त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर केंद्राकडे हा प्रकल्प पाठविला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एमसीआयची मान्यता झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळणार आहे.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्या, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख यांची न्यासाचे सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली आहे.

मात्र, पुणे महापालिकेतील काँग्रेस, शिवसेना, मनसे, एमआयएम या पक्षांच्या पक्षनेत्यांची मात्र सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आलेली नाही. या नेत्यांचा समावेश करण्यासाठी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.