Pune News : ‘आत्म निर्भर भारत’ घोष वाक्य स्पर्धेत परवीन शेख प्रथम

ऑनलाईन स्वरूपात झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विविध विभागाचे 28 विद्यार्थी सहभागी झाले. : Parveen Sheikh first in the 'Aatma Nirbhar Bharat' slogan competition

एमपीसी न्यूज – आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे ‘आत्म निर्भर भारत ‘विषयावर घोष वाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत परवीन शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

ऑनलाईन स्वरूपात झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विविध विभागाचे 28 विद्यार्थी सहभागी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

स्पर्धेत परवीन शेख यांचा प्रथम, रूपा राय यांचा द्वितीय तर आशिया शिराळकर यांचा तृतीय क्रमांक आला. डॉ फरझाना शेख, प्रा. नाझिया मालदार यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.

प्राचार्य शैला बुटवाला, विभागप्रमुख डॉ. एम. जी. मुल्ला यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.