Jumbo Hospital: दिवसातून तीनवेळा मिळणार रुग्णांची माहिती, नातेवाईकांना व्हिडिओ कॉलवरून साधता येणार रुग्णांशी संवाद

जम्बो सेंटर'मध्ये बाऊन्सर ऐवजी आता पुणे महापालिकेचे सुरक्षारक्षक, सुरक्षा अधिकारी नेमण्याचे आदेश मोहोळ यांनी दिले आहेत.

एमपीसी न्यूज – शासकीय अभियांत्रिकी विद्यालय (COEP) मैदानावरील जम्बो कोविड रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज प्रतीक्षालय व हेल्प डेस्क उभारण्यात आले आहे. दिवसातून तीनवेळा रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली जाणार आहे. तसेच नातेवाईकांना व्हिडिओ कॉलवरून रुग्णांशी संवाद साधता येणार आहे. नातेवाईकांसाठी वेटिंग रूम उभारण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जम्बो कोविड रुग्णालयात दाखल रुग्णाशी नातेवाईकांचा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद करून द्यावा असा आदेश दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या वतीने टॅबची व्यवस्था केली आहे.

आरोग्य कर्मचारी रुग्णाजवळ जाऊन हेल्पडेस्क येथील नातेवाईकाशी व्हिडिओ कॉल जोडून देतील. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नातेवाईक रुग्णालयात दाखल रुग्णाबरोबर संवाद साधत तब्येतीची विचारपूस करू शकणार आहेत. नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबतची माहिती दिवसातून तीनवेळा मिळणार आहे.

जम्बो रुग्णालयात सुसज्ज व पारदर्शक यंत्रणेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सूचना दिल्या आहेत. ‘जम्बो सेंटर’मध्ये बाऊन्सर ऐवजी आता पुणे महापालिकेचे सुरक्षारक्षक, सुरक्षा अधिकारी नेमण्याचे आदेश मोहोळ यांनी दिले आहेत. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना सौहार्दपूर्ण वागणूक देण्याच्या सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या आहेत.

‘जम्बो सेंटर’साठी महापालिकेकडून 50 डॉक्टर्स आणि 120 वैद्यकीय सेवेतील कर्मचारी सेवा देणार आहेत. यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेसाची समस्या सुटण्यास यामुळे मदत होणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या जम्बो रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या 15 करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला (रविवारी 1 + सोमवारी 14). घरी सोडताना रुग्णांशी संवाद साधून डॉक्टर त्यांना काळजी घेण्याबाबत सूचना देत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.