Pune News : पवनानगर येथे बिबट्याला जेरबंद करण्यात यश

एमपीसी न्यूज : पवनानगर येथे वनविभाग व (Pune News) वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने एका बिबट्याला जेरबंद केले आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिमकडेच्या तालुक्यात सह्याद्री डोंगररांगा, धरणे, वन व मोठ्या प्रमाणात उसलागवड असल्याने बिबट्याचा वावर जास्त आहे. यातील एक तालुका मावळ आहे. तसेच आता शेतामध्ये ऊसतोड चालू असल्याने बिबट्याच्या लपण्याच्या जागा कमी होत आहेत. त्यामुळे बिबटे मनुष्यवस्तीत शिरकाव करताना दिसत आहेत.

आज सोमवारी 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास मौजे पानसोली ता.मावळ येथे बिबट्याचे दर्शन घडले. या संदर्भात स्थानिक महिला दिपाली आनंदा ठोंबरे यांचे दूरध्वनीवर प्राप्त संदेशनुसार सदर ठिकाणी हनुमंत. ए. जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ, (Pune News) डी. पी. डोमे वनपाल देवळे, वनपाल वडगाव, वनपाल लोणावळा आणि रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव व वन्यजीव रक्षक, मावळ यांचे सहाय्याने पानसोली (कोळेचाफेसर)  मालकी गट नंबर 16 मध्ये 1 वर्ष वयाचा बिबट्या तारेच्या कुंपणामध्ये अडकला. या बिबट्याच्या चारही पायाला काचेमुळे जखमा झाल्याने रेस्क्यु करण्यात आले.

बिबट जखमी असल्याने पुढील उपचारासाठी रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव येथे पाठवण्यात आले आहे. सदर रेस्क्यु अॅापरेशन साठी एन.आर.प्रवीण (भा.व.से) मुख्य वनसंरक्षक प्रा. पुणे, राहुल पाटील, (भा.व.से) उपवनसंरक्षक प्रा. पुणे व आशुतोष शेंडगे सहाय्यक वनसंरक्षक प्रा. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली एच. ए. जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ, श्रीमती डी. पी. डोमे वनपाल देवले, वनपाल वडगाव, वनपाल लोणावळा , वनकर्मचारी आणि रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव व वन्यजीव रक्षक मावळ संस्था, उपस्थित होते.

वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे निलेश गराडे, अनिल अंद्रे, गणेश निसाळ, विनय सावंत व जिगर सोलंकी उपस्थित होते व त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी मदत केली.

Pune News : पुण्यातील जगधने टोळीवर मोक्काची कारवाई

वनविभाग वडगाव मावळ तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या टीमने बिबट्याला जेरबंद केले आहे.अशी माहिती वनपरिक्षक अधिकारी हनुमंत जाधव यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.