Pune News : पवार – जानकर भेटीने राजकीय चर्चांना उधाण

एमपीसीन्यूज : भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असलेले आणि यापूर्वीच्या सरकारमध्ये कॅबीनेट मंत्री राहिलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, जानकर यांनी ही भेट केवळ एका वैयक्तिक कामासाठी हाेती तसेच ते काम पवार यांनी केल्याचा खुलासा जानकर यांनी केला आहे.

जानकर यांनी यासंर्दभात स्पष्टीकरण देताना सांगितले की, आमचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या परवान्यासंर्दभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. कारखान्याचे परवान्याचे काम झाले आहे. गुट्टे यांचे साखर कारखान्याचे प्रकरण न्यायालयात आम्ही जिंकले. त्यानंतर कारखान्याचा परवाना मिळण्याकरिता प्रयत्न सुरु हाेते.

पवार हे सध्या राज्याचे राज्यकर्ते असल्याने त्यांना भेटल्यानंतरच काम हाेणार हाेते. त्यामुळे दाेन डिसेंबर राेजी अजित पवारांची, तर तीन डिसेंबरला शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांना भेटीकरिता फाेन केल्यानंतर त्यांनी भेटण्यास हाेकार दिल्याने त्यांची भेट घेतली.

या भेटीत काेणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. या भेटीबाबतची माहिती विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्याचे जानकर यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.