Pune News : दर महिन्याला वीज बिल भरणे हे ग्राहकांचे कर्तव्य – महावितरण

एमपीसी न्यूज – वीजबिलांच्या वसूलीवरच महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे. त्यामुळे वीजबिलाची रक्कम दरमहा किरकोळ असली तरी आता दरमहा वीजबिलांचा नियमित भरणा करण्यास ग्राहकांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे असे महावितरण म्हणते.(Pune News) महावितरण स्वतः वीजनिर्मिती करीत नाही. तर विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून ती मागणीनुसार सर्व वर्गवारीतील ग्राहकांना पुरवठा करते. वीजपुरवठा व ग्राहकसेवा देणारी महावितरण कंपनी ही स्वतःच ग्राहक मानते.

 

ना नफा, ना तोटा’ (रेव्हेन्यू न्यूट्रल) तत्त्वाने वीजपुरवठा व ग्राहकसेवा देणाऱ्या तसेच जनतेच्या मालकीची असलेल्या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत कोट्यवधी रूपयांचे दायित्व आहे. दुसरीकडे वीजग्राहकांकडे थकबाकीचा मोठा डोंगर आहे. अशा गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणच्या अस्तित्वाचा सध्या बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोनानंतरही जनजीवन सामान्य झाले असले तरी वीजबिलांचा नियमित भरणे होत नाही.

 

Tathawade News – ताथवडेच्या जीएसपीएम कॉलेजमध्ये उद्या इनोव्हिजनचे उदघाटन

 

आजच्या घडीस वीज ही एक मूलभूत गरज झालेली आहे. अन्न, वस्त्र व निवारा किंबहूना त्यापेक्षाही महत्वाची गरज झालेली आहे. विजेशिवाय जगणे हा विचारच आजमितीस कोणी करु शकत नाही.(Pune News) घरातील टीव्ही, फ्रिज, मोबाईल, मुलांचे ऑनलाईन शिक्षण, नोकरदारांचे ऑनलाईन काम, घरातील उपकरणे इत्यादी प्रामुख्याने विजेवरच अवलंबून आहेत असे दिसून येते. ग्राहकांना या सर्व गोष्टी हव्या आहेत व त्यासाठी लागणारी वीजसुध्दा हवी आहे. परंतु आलेले वीजबिल नियमितपणे भरणे हे ग्राहकांकडून होताना दिसून येत नाही.

 

त्यामुळे वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत वीजबिलांना नियमित भरून महावितरणला सहकार्य करण्याची खरी गरज आहे. त्यासाठी घरबसल्या थकबाकी व चालू वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.