22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Pune News : आयटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – आयटी उद्योगाला दिलासा देताना बीपीओ आणि आयटी आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठीच्या नियमांना अधिकाधिक शिथील करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. सरकारने नोंदणी आणि अनुपालन संबंधीच्या बहुतांश आवश्यकता शिथिल केल्या आहेत त्यामुळे कंपन्यांसाठी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची सुविधा देणे सुलभ होणार आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने गुरुवारी या संबंधीच्या महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली.

केंद्र सरकारच्या बदलांनुसार कंपन्यांवरील वेळोवेळी रिपोर्टिंग आणि अन्य जबाबदाऱ्या समाप्त करण्याची घोषणा केली आहे. दूरसंचार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या विस्तृत मार्गदर्शक तत्त्वांमुळे वर्क फ्रॉम होमच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळणार आहे. वर्क फ्रॉम होमचा विस्तार करून वर्क फ्रॉम एनिवेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विस्तारित एजंट आणि रिमोट एजंटला ( वर्क फ्रॉम होम/एनिवेअर) काही अटींसह मान्यता देण्यात आली आहे.

उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा आणि भारताला सर्वाधिक प्रतिस्पर्धी म्हणून आयटी ठिकाणाच्या रूपात समोर आणण्याचा नव्या नियमांचा हेतू आहे. नव्या नियमांमुळे कंपनीला वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम एनिवेअर संबंधित धोरणांचा अवलंब करण्यास मदत होईल.

spot_img
Latest news
Related news