Pune News : 30 वर्षांनी बदलला फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रम

फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रम बदलण्याच्या निर्णयाचे पुण्यात स्वागत

0

एमपीसी न्यूज – फार्मसी शिक्षणातील डिप्लोमा (पदविका) अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय कौन्सिल ऑफ फार्मसीने घेतला असून 16 ऑक्टोबर रोजी त्याची अधिसूचना जारी केली आहे. 30 वर्षांनी कालबाह्य अभ्यासक्रम बदलल्याने पुण्यातील फार्मसी महाविद्यालयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

‘नव्या जगातील नव्या बदलांना साजेसा हा निर्णय असून आम्ही त्याचे स्वागत करतो’ असे हा अभ्यासक्रम बदलण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आझम कॅम्पस चे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांनी म्हटले आहे.

‘फार्मसी शिक्षणाच्या भवितव्यासाठी कालबाह्य अभ्यासक्रम बदलणे आवश्यक होते. फार्मसी शिक्षणाचा दर्जा उंचावणे यामुळे शक्य होणार आहे. आम्ही अभ्यासक्रम बदलला जावा यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे सतत पाठपुरावा करीत होतो. त्याला यश आले आहे’, असे डॉ. व्ही. एन. जगताप यांनी पत्रकाद्वारे सांगितले . ते म्हणाले, ‘नव्या कालोचित अभ्यासक्रमात कौशल्ये, ज्ञान, रोजगारभिमुकता आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. ‘

अभ्यासक्रम बदलण्याच्या प्रक्रियेचा अनेक फार्मसी महाविद्यालयांनी पाठपुरावा केला होता. भारती विद्यापीठच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ आत्माराम पवार म्हणाले,’ 30 वर्षांत पदविका अभ्यासक्रमात एकही बदल करण्यात आला नव्हता. अभ्यासक्रमात बदल करावा ही आमची जुनी मागणी होती. ती मान्य झाल्याचा आनंद आहे. यामुळे फार्मसी पदविका अभ्यासक्रमाला नवी दिशा मिळणार आहे. ‘

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनीही केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. सेंट्रल ऍडव्हायजरी बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य डॉ. लतीफ मगदूम यांनीही तेथे प्रयत्न केले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव इरफान शेख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.