Pune News : पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्याकडून प्लाझ्मा दान

एमपीसी न्यूज – कोरोनामुक्त झाल्यावर पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी शनिवारी सकाळी प्लाझ्मा दान केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानुसार आपण प्लाझ्मा दान केल्याची माहिती बाबा धुमाळ यांनी दिली.

जनकल्याण ब्लड बँक स्वारगेट येथे त्यांनी प्लाझ्मा दान केला. यावेळी डॉ. मानसी ठाकूर, डॉ. अतुल कुलकर्णी उपस्थित होते. या प्लाझ्माचा उपयोग कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी होतो.

कोरोनाच्या आजारातून बरे झाल्यानंतर कोणतीही लक्षणे नसलेले नागरिक प्लाझ्मा दान करू शकतात, या प्लाझ्मामुळे कोविड रुग्णांची प्रतीकार शक्ती वाढविता येते.

प्लाझ्मा देणाऱ्या नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडीज पाहिली जाते. ही सर्व प्रक्रिया पाऊण तासाची असते. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही, अशी माहिती डॉ. मानसी ठाकूर यांनी दिली.

कोवीड – 19 वर आजतागायत कुठलेही रामबाण औषध निघाले नाही. कोवीडबाधित रुग्ण 45 दिवसानंतर कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुस-या बाधित रुग्णाला देता येतो.

कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाइमा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रूग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते.

त्यामुळे कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

माझा मुलगा मनीष धुमाळ सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करणार आहे. पुणे शहरातील जे जे रुग्ण कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झाले त्यांना देखील प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन आवाहन बाबा धुमाळ यांनी केले आहे.

प्लाझ्मा दानामुळे दोन व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे आपण किंवा आपल्या परिचित व्यक्तीला प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करावे, असेही धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.