-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : ‘पीएमपी’च्या कंडक्टरने सिनेस्टाईलने पकडला ब्रेसलेट चोर !

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएल ड्रायव्हर आणि कंडक्टरांच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांचा नेहमी तक्रारीचा सूर असतो. परंतु, एका कंडक्टरने प्रवाशाचे तीन तोळ्याचे सोनेरी ब्रेसलेट चोरणाऱ्या चोरट्याला सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून पकडून देत धाडसी कामगिरी केली आहे.

नरवीर तानाजी वाडी डेपोतील मधुकर विठ्ठल गायकवाड यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मनपा ते तळेगाव ढमढेरे बसवर कर्तव्य बजावत असताना त्यांनी ही कामगिरी केली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

घडले असे की, लक्ष्मण पिराजी गायकवाड त्यांच्या पुतणीसोबत तळेगाव ढमढेरेच्या दिशेने बसमधून प्रवास करत होते. त्यावेळी वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ बस थांबली असता एका चोरट्याने त्यांच्या हातातील तीन तोळ्याची सोनेरी ब्रेसलेट हिसकावून पळ काढला.

प्रसंगावधान साधत कंडक्टर मधुकर गायकवाड यांनी चोरट्याचा सिनेस्टाईलने पाठलाग करत त्याला पकडले. त्यानंतर ब्रेसलेट लक्ष्मण गायकवाड यांना परत केले आणि त्या चोरट्याला लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांकडे सुपूर्त केले.

गायकवाड यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.