Pune News : पुण्यात पीएमपीएमएल बसने रस्ता ओलांडणाऱ्या दोन अंध विद्यार्थ्यांना दिली धडक

एमपीसी न्यूज – पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर कर्वे (Pune News) रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या दोन अंध विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने धडक दिली आहे. ज्यामध्ये दोन्ही विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी अकरा वाजता घडली.

वैभव विष्णू क्षिरसागर (वय 22, रा. वारजे माळवाडी) व मयुरी मुरलीधर गरुड (वय 20, रा. शासकीय वसतीगृह मोशी) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. पुणे स्टेशनवरुन एनडीए गेटकडे जाणा-या बसने हा अपघात झाला. डेक्कन पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.

Tukaram Maharaj : बागेश्वर महाराजांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी

वैभव हा एमए प्रथम वर्ष तर मयुरी बीएच्या पहिल्या वर्गात गरवारे महाविद्यालयात (Pune News) शिक्षण घेत आहेत. वैभवच आज प्रॅक्टीकल होते. वैभव व मयुरी या दोघांचीही घरची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून बस चालकाच्या हलगर्जीपणाबद्दल टिका केली जात आहे. दोन्ही विद्यार्थ्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून याचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.