Pune News: PMPML चे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण घटले

एमपीसी न्यूज – PMPML च्या बसचे ब्रेक डाऊन झाल्यास दोषींवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे आठवड्याभरातच ब्रेक डाऊनचे प्रमाण घटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली PMPML ची सेवा या महिन्यात सुरू करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाताला रोजगार मिळाला. बसेस सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ब्रेक डाऊनचे सत्र सुरू झाले होते.  तीन ते सात सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत 164 बसचे ब्रेक डाऊन झाले. त्याची व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी गंभीर दाखल घेतली.

ब्रेक डाऊनला जबाबदार असणाऱ्यांवर पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा इशारा जगताप यांनी दिला होता. सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे यांच्याकडे ती जबाबदारी सोपविली. 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत केवळ 50 बस ‘ब्रेक डाउन’ झाल्याची माहिती PMPML  प्रशासनातर्फे देण्यात आली.
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे मागील 5 ते 6 महिने PMPML ची सेवा बंद होती. त्यामुळे सामान्य पुणेकरांची मोठी गैरसोय झाली. आता ही सेवा सुरू झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बसेसचे निर्जंतुकीकरण करणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, मास्क लावणे अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी PMPML सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.