Pune News : PMPMLच्या दैनिक व मासिक पासाचे दर निश्चित, ‘असे’ आहेत नवे दर

एमपीसी न्यूज – PMPMLच्या दैनिक व मासिक पासाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. एका मनपा हद्दीत प्रवासासाठी दैनिक पास 40 व मासिक पास 900 रुपये असेल. तर, दोन्ही मनपा हद्दीत प्रवासासाठी दैनिक पास 50 व मासिक पास 1200 रुपये असणार आहे. दैनिक पास वाहक मार्गावर असताना ई तिकिट मशिनमधून प्रवाशांना वितरीत केले जातील. 07 ऑक्टोबर पासून या नवीन दरांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सध्या चलनात असलेले दैनिक पास 70 व ज्येष्ठ नागरीक दैनिक पास 40 या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तो पुर्वी प्रमाणेच वितरीत करण्याची कार्यपद्धती राहणार असल्याचे पीएमपीएमएलने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

एका मनपा हद्दीतील मासिक व दोन्ही मनपा हद्दीतील मासिक पास प्रवाशांना पास केंद्रावर उपलब्ध होतील व पुर्वी प्रमाणेच चलनात असलेले मासिक पासेसमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने तो प्रवाशांना पुर्वीच्या कार्यपद्धतीने पास केंद्रावर वितरीत करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.