Pune News : पोलीस भरतीची लेखी परीक्षा दोन एप्रिल रोजी

एमपीसी न्यूज – शहर पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया सुरू असून, इच्छुक उमेदवारांची ( Pune News ) मैदानी चाचणी शुक्रवारी (दि.17) पूर्ण झाली. त्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी दोन एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली. दरम्यान, या भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच पाच तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदविला आहे.

 

 

पुणे शहर पोलिस दलासाठी ‘पोलिस भरती-2021’ प्रक्रियेस तीन डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. इच्छुक उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी मैदानी परीक्षा घेण्यात आली.

 

Pune News : फोरसाइट कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

 

 

यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मेरीट यादी पाच-सहा दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस मुख्यालयातील अधिकारी दशरथ हटकर यांनी दिली. दरम्यान, गृह विभागाच्या ( Pune News ) परिपत्रकानुसार पोलीस चालकपदा ची लेखी परीक्षा 26 मार्च रोजी होणार आहे. तर, पोलिस शिपाई पदाची लेखी 2 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.