Pune News : मोदीजींच्या जीवन कार्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा देशाला या संकटातून नक्की बाहेर काढेल : महापौर 

एमपीसी न्यूज – सेवा सप्ताहच्या काळात एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.  या निमित्ताने मोदी सरकारच्या योजना व प्रेरणादायी जीवन प्रवास समाजापुढे यशस्वीपणे मांडण्यात आला. मोदीजींच्या जीवन कार्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा देशाला या संकटातून नक्की बाहेर काढेल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमामध्ये संघर्षमय जीवनप्रवास, घेतलेले  ऐतिहासिक निर्णय, सर्वसामान्यांसाठीच्या योजना अशा विविध मुद्द्यांवर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आले.

याप्रसंगी आमदार भिमराव तापकीर यांची उपस्थिती होती. त्यांनी प्रभाग 32 मध्ये घेतलेल्या विविध कार्यक्रमांचे कौतुक केले. तसेच, आगामी काळात ही स्वच्छता मोहीम राबविण्याचे आणि समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्ष पुणे शहराचे सरचिटणीस गणेश घोष यांनी मोदी सरकारच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यास सांगितले.

या प्रदर्शनास सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन सर्व सामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना  पोहचविण्याचा एक छोटासा प्रयत्न या भावनेतून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्विकृत सभासद सचिन दांगट, दत्तात्रय चौधरी, अभिजीत धावडे, माधव देशपांडे, काका वाघमारे, मंदार रेडे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक किरण अरविंद बारटक्के यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.