Pune News : पोस्ट ऑफिसच्या सेवा संदर्भात तक्रार निवारणासाठी 27 सप्टेंबरला डाक अदालत

एमपीसी न्यूज – पोस्ट ऑफिसच्या सेवा संदर्भात तक्रार निवारणासाठी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहर पश्चिम विभाग अंतर्गत येणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या सेवा संदर्भात ही अदालत असेल. प्रवर अधिक्षक डाकघर, पुणे शहर पश्चिम विभाग यांच्या कार्यालात 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ही अदालत घेतली जाणार आहे.

डाक विभागाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, पुणे शहर पश्चिम विभागाअंतर्गत येणाऱ्या कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड, पुणे शहर, गणेशखिंड, डेक्कन जिमखाना व कोथरूड या पोस्ट ऑफिसच्या सेवासंदर्भात तक्रार निवारण करण्यात येणार आहे. या पोस्टाच्या कामासंबधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे.

टपाल काउंटरसेवा रजिस्टर व पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबत तक्रारी घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. पुणे शहर पश्चिम विभाग, प्रवर अधिक्षक डाकघर मुकुंद बडवे यांचे कार्यालय लोकमान्यनगर पोस्ट ऑफिस इमारत यांच्या नावे 20 सप्टेंबरपर्यंत तक्रा पाठवता येईल. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही असे पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.