Pune News : आधार नोंदणी, अपडेट व मोबाईल लिंक करण्यासाठी डाक विभागाची तीन दिवस ‘विशेष मोहीम’

एमपीसी न्यूज – डाक विभागातर्फे 9 ते 11 सप्टेंबर असे तीन दिवस ‘आधार नोंदणी अद्यतन आणि मोबाईल लिंकिंग’ साठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या विशेष मोहिमे दरम्यान नवीन आधार नोंदणी, आधार कार्ड मोबाईल नंबरला जोडणे, आधार पॅन कार्डला जोडणे, आधार बायोमेट्रिक अपडेट करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.

पुणे मुख्य डाकघर (जी. पी. ओ.), मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस, येरवडा पोस्ट ऑफिस, हडपसर पोस्ट ऑफिस, चिंचवड पूर्व पोस्ट ऑफिस, चिंचवडगाव पोस्ट ऑफिस, औंध कॅम्प पोस्ट ऑफिस, खडकी पोस्ट ऑफिस, पी पिंपरी पी. एफ. पोस्ट ऑफिस, पिंपरी कॉलनी पोस्ट ऑफिस, पी. सी. एन. टी पोस्ट ऑफिस, भोसरीगाव पोस्ट ऑफिस येथे विशेष सुविधा करण्यात आली आहे.

पुणे शहर पूर्व विभागाचे प्रवर अधीक्षक गोपराजु सतीश यांनी सांगितले की, या विशेष मोहिमे दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व डाकघरांमध्ये आधार नोंदणी अद्यतन आणि आधार मोबाईल लिंकिंगची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी किंवा आपल्या परिसरातील पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.