Pune News : माणिकबाग परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज – माणिकबाग परिसरात वीज पुरवठा वारंवारखंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आले असून या समस्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते दीपक नागपुरे यांनी महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी तसेच सहाय्यक अभियंता दिनेश फुलझले यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी नागरिकांच्या समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली.

_MPC_DIR_MPU_II

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असंख्य नोकरदारांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कामावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासेसवर परिणाम होत आहे.

तसेच वीजपुरवठा नसल्यामुळे पाणीपुरवठाही प्रभावित होत आहे. या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, महावितरणने पुढील आठ दिवसात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.