Pune News : प्रणव मुखर्जी यांचे कार्य विद्वत्तापूर्ण व गौरवशाली : डॉ. नीलम गोऱ्हे

मुखर्जी आणि शिवसेनेचे अतिशय सलोख्याचे आणि घनिष्ट संबंध होते.

एमपीसी न्यूज – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 31  आ्ँगस्ट 2020 रोजी निधन झाले. मुखर्जी आणि शिवसेनेचे अतिशय सलोख्याचे आणि घनिष्ट संबंध होते. त्यांचे कार्य विद्वत्तापूर्ण होते, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी  मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.

डॉ.  गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील महिलांच्यावतीने मुखर्जी यांच्या निधनाबाबत अतिशय दुःख व्यक्त केले.

मुखर्जी यांची राष्ट्रपती म्हणून नियुक्ती होण्याच्या हालचाली सुरू झाल्या  त्यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा शिवसेनेने मुखर्जी यांना पूर्ण पाठिंबा दिला होता.

मुखर्जी यांचे देशासाठीचे कार्य अतिशय विद्वत्तापूर्ण व गौरवशाली होते, अशा शब्दात डॉ.गोऱ्हे यांनी श्रद्धांजली वाहिली. देशात सत्ता परिवर्तन झाले तरी देखील राष्ट्रपती पदाची जबाबदारी त्यांनी गरिमा संभाळून पूर्ण केली.

त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना डॉ. गोऱ्हे यांनी मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.