Pune News : पुणे शहर भाजप ‘युवा वॉरिअर्स’ शहर अध्यक्षपदी प्रतिक गुजराथी

एमपीसी न्यूज – पुणे शहर भाजपच्या ‘युवा वॉरिअर्स’ या आघाडीच्या शहर अध्यक्षपदी प्रतिक गुजराथी यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांनी गुजराथी यांना नियुक्तीचे पत्र दिले.

प्रतिक गुजराथी हे भारतीय जनता पक्ष पुणे शहर विद्यार्थी आघाडी संपर्कप्रमुख आहेत. नारायणदास फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. पुणे शहरातील युवकांना एकत्र करुन भाजपच्या माध्यमातून राजकीय प्रवाहात आणण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे गुजराथी यांनी सांगितले.

तसेच, युवकांच्या रोजगार निर्मितीसह विविध सामाजिक हिताच्या उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे गुजराथी म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.