_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News: पावसाळापूर्व कामे अपूर्ण; अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करा – ॠषीकेश बालगुडे

0

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेज, पावसाळी लाईनची कामे चालू आहेत. ही कामे 31 मे 2021 पूर्वी करणे अपेक्षित होते. परंतु, पावसाळा सुरु होऊनही कामे पूर्ण झाली नाहीत. त्याचा पुणेकरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बेजाबदारपणा केल्याबद्दल अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. संबंधित अधिकाऱ्यांवर दिरंगाई बद्दल कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस ॠषीकेश उर्फ आबा बालगुडे यांनी केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. त्यात बालगुडे यांनी म्हटले आहे की, पुणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेज, पावसाळी लाईनची कामे चालु आहेत. ही कामे 31 मे 2021 पूर्वी करणे अपेक्षित होते. परंतु, ही कामे पूर्ण झालेली नाही. यानंतर महापालिकेने 8 जून 2021 पर्यंत कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. तरी, सुध्दा आजतागायत कामे पूर्ण झालेली नाही. अनेक पुणेकर नागरिकांची गैरसोय होत असून वाहतूक जाम होणे , छोटे-मोठे अपघात होणे याचे प्रमाण वाढत आहे.

मुख्यत: छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव रस्ता, टिळक रोड, व इतर पेठेतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन, पाण्याची लाईन यांची कामे चालू आहेत. काही ठिकाणी कामे झाली आहेत. काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तेथील कामातील राडारोडा रस्त्यावर तसाच पडला आहे. खड्डे सुद्धा आहेत. या गोष्टींचा पुणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांना बेजाबदारपणा केल्याबद्दल काळ्या यादीत टाकावे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा. अधिकाऱ्यांवर दिरंगाई बद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बालगुडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment