Pune News : पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऐवजी 9 ऑगस्टला

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी)  23 मे 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याबाबत जाहिर करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 9 ऑगस्टला होणार आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही 8 ऑगस्टला घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु 8 ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा 8 ऐवजी 9 ऑगस्टला घेण्यात येणार आहे.

तसेच या परीक्षेचे प्रवेशपत्र 27 जुलै रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बदलाबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.