Pune News : पुण्यात ‘या’ तीन ठिकाणी सुरू होणार प्रीपेड ऑटोरिक्षा

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्थानकासोबतच स्वारगेट आणि वाकडेवाडी एसटी बसस्थानक (Pune News) परिसरात प्रीपेड ऑटोरिक्षा सेवा सुरू करण्याचे नियोजन वाहतूक पोलिसांनी केले आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधला आहे. त्याचबरोबर काही रिक्षा संघटनांशीही चर्चा झाली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांची होणारी लूट थांबणार आहे.

रेल्वे स्थानक आणि शहराच्या इतर भागात ऑटोरिक्षा चालकांकडून प्रवाशांची अडवणूक केली जाते. बंद भाडे नाकारणे, मीटरपेक्षा जास्त भाडे आकारणे, प्रवाशांशी गैरवर्तन अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

ऑटोरिक्षाचालकांविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया किचकट असल्याने नागरिक तक्रार करत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रीपेड ऑटोरिक्षा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाने डीसीपी (वाहतूक) विजय मगर यांच्याशीही चर्चा करून पुणे स्थानकातून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. यासोबतच आरटीओचे माजी सदस्य बाबा शिंदे यांच्यासह अन्य सदस्यांनी वाहतूक पोलिस उपायुक्तांची भेट घेऊन पुणे रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी प्रीपेड रिक्षा सुरू करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार वाहतूक पोलिसांनी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू (Pune News) करण्यास हिरवा कंदील दिला आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत तीन ठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डीसीपी मगर म्हणाले, “पुणे रेल्वे स्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी प्रीपेड ऑटोरिक्षा सुरू करण्याची मागणी होती. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट, वाकडेवाडी बसस्थानक परिसरात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Chinchwad News : श्री गजानन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी योगेश बाबर यांची निवड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.