Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार दाखल !

एमपीसी न्यूज : कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीचे जगभरात कौतुक होत आहे. भारतीय शास्त्रज्ञांची ही कौतुकास्पद कामगिरी पाहण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी (दि.28) हजर राहणार आहेत.

जगभरातील संशोधक शास्त्रज्ञ कोरोना महामारीवर मात करू शकणारी लस शोधत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लस तयार झाली असून त्याच्या मानवावरील प्राथमिक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असून, चाचणीचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या संशोधनाचे कौतुक जगभरातून केले जात आहे.

शनिवारी दुपारी 1 ते 2 दरम्यान पंतप्रधान मोदी कोविशिल्ड लसीचा आढावा घेणार आहेत. मात्र या भेटीमध्ये पंतप्रधानांसमवेत 100 देशांचे राजदूत उपस्थित राहणार नसून 4 डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहे.

सर्व 100 राजदूत 27 नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येऊन सीरम आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देणार होते.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला भेट देणार असल्याने प्रशासनाकडून या पुणे दौरा यशस्वी करण्यासाठी प्रचंड तयारी सुरू आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.