Pune News : कोरोना लसीकरण जलदगतीने होण्यासाठी खाजगी कंपन्यांना स्वखर्चाने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी परवानगी द्यावी – आबा बागुल

एमपीसी न्यूज – शहरात कोरोना लसीकरण जलदगतीने होण्यासाठी आयटी इंडस्ट्री, व्यापारी, मोठं-मोठे उद्योग, कंपन्या, खासगी संस्था यांना स्वखर्चाने कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यास परवानगी द्यावी, काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

पुणे शहर व परिसरात तसेच पुणे जिल्ह्यातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्याचा प्रसार अद्यापही रोखला जात नाही. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझिंग आदी प्रकारे पायबंद घालण्याचा प्रयत्न होत असूनही तो कमी पडत आहे. अशावेळी लसीकरण हाच एक प्रभावी उपाय आहे. शासकिय पातळीवरती लसीकरण सुरू असून प्रत्येक केंद्रावर 100 ते 150 लसीकरण होत आहे. पुणे शहराची लोकसंख्या पाहता हा वेग अतिशय कमी आहे.

शहरात लसीकरण लवकर होण्यासाठी आयटी इंडस्ट्री, व्यापारी, मोठंमोठे उद्योग,कंपन्या खासगी संस्था यांना स्वखर्चाने त्यांच्या कामाच्या ठिकाणी परवानगी देण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व पुणे महानगरपालिकेचे आयुक्तांना दिल्याचे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले.

बागूल म्हणाले की, पुणे शहरातील आयटी इंडस्ट्री व्यापारी,मोठं-मोठे उद्योग, कंपन्या, खासगी संस्था लस खरेदी करून आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यास तयार आहेत. त्यासाठी लागणारे डॉक्टर व इतर सर्व स्टाफची व्यवस्था देखील ते करणार असून बाजारात उपलब्ध असलेल्या लस घेऊन कर्मचाऱ्यांना देऊन शासकीय नियमांप्रमाणे नोंदणी करण्यास तयार आहेत. यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या दिल्यास लाखो कर्मचाऱ्यांना लसीकरण होईल व महापालिकेवरचा लसीकरणाचा ताण कमी होईल. शहरात लसीकरण देखील मोठ्या झपाट्याने होईल.

त्यासाठी कंपनी ऍक्ट नुसार रजिस्टर असलेल्या सर्व आयटी इंडस्ट्री,व्यापारी,मोठं-मोठे उद्योग, कंपन्या, खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लसीकरणाची सोय होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या महानगरपालिकेने द्याव्यात तसेच हे सर्व आपल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण स्वखर्चाने देण्यास तयार असून त्यांच्याशी चर्चा करून शहरातील लसीकरण मोहीम लवकर पूर्ण करण्यास गती मिळेल त्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या द्याव्यात असे आबा बागुल म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.