Pune News : अखेर प्रस्तावित मिळकत करवाढ फेटाळली !

एमपीसी न्यूज : उत्पन्नवाढीसाठी पुणे महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पामध्ये तब्बल 11 टक्के मिळकत करवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. लोकभावना आणि आगामी महापालिका निवडणुकांमधील संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी स्थायी समितीने मिळकत करवाढीचा प्रस्ताव फेटाळला.

गत महिन्यात 29  जानेवारी रोजी सन 2021 – 22 या आर्थिक वर्षासाठी 7 हजार 650  कोटींचे बजेट आयुक्त विकम कुमार यांनी स्थायी समितीला सादर केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या बजेटमध्ये मिळकतकरात 11 टक्के वाढ प्रस्तावित केली होती. या करवाढीवर निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची खास सभा आज झाली. या सभेत मिळकतकरातील 11 टक्के वाढ एकमताने फेटाळण्यात आली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मिळकतकरातील 11 टक्के वाढीला शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि शहर प्रमुख संजय मोरे यांनी जोरदार विरोध केला होता. राष्ट्रवादीच्या गटनेत्या तथा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनीही करवाढीला विरोध केला होता. त्यावर मिळकतकरातील वाढ स्थायीने फेटाळली आहे.

त्यामुळे आयुक्तांनी बजेटमध्ये उत्पन्नात ग्राह्य धरलेली 130  कोटींची वाढ कमी होणार आहे. त्यामुळे बजेटचे आर्थिक गणित बसविण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना आकड्यांची कसरत करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1