Pune News : कमला नेहरू रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेडस उपलब्ध करा : पृथ्वीराज सुतार

कोरोना रुग्णांसाठी हे बेड उपलब्ध करुन द्यावेत, त्यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, त्यावर काहीही कारवाई होत नाही.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील कमला नेहरू रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेडस तातडीने उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्यावर गेली आहे. अडीच हजारांवर नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. रोज साधारण दोन हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत.

एकूणच कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर बेडस मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा उपचारविनाच मृत्यू होत आहेत.

कमला नेहरू हॉस्पिटल हे 400 बेडसचे हॉस्पिटल आहे. या ठिकाणी सर्व सोयी – सुविधा उपलब्ध आहेत. ऑक्सिजन व्यवस्था असलेले बेड या ठिकाणी तयार आहेत.

कोरोना रुग्णांसाठी हे बेड उपलब्ध करुन द्यावेत, त्यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, त्यावर काहीही कारवाई होत नाही.

भविष्यात बेडस न मिळाल्यामुळे पुणेकरांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी त्वरित कमला नेहरू रुग्णालयात 100 ऑक्सिजनचे बेडस उपलब्ध करून घ्यावेत.

8 दिवसांत हे बेडस उपलब्ध करुन दिले नाही तर बेडस अभावी होणाऱ्या मृत्यूची जबाबदारी ही प्रशासनाची राहील, असा इशाराही पृथ्वीराज सुतार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.