Pune News : सेवानिवृतीनंतर प्रतिमहा 10 हजाराची प्रोव्हिजनल पेन्शन सुरु करा : काँग्रेसचे नगरसेवक रफिक शेख यांचा प्रस्ताव

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेत अनेक वर्षे सेवा करून सेवानिवृत्तीनंतर हक्काचे पैसे मिळणेसाठी होणारा मानसिक त्रास थांबविणेसाठी प्रतिमहा 10 हजार रूपये प्रोव्हिजनल पेन्शन सुरु करण्यात यावी. पेन्शन प्रकरण पूर्ण झालेनंतर प्रोव्हिजनल पेन्शन व प्रत्यक्षात मिळणारी पेन्शन समायोजित करून फरकासह पेन्शन चालू करावी, असा ठराव काँग्रेसचे नगरसेवक रफिक शेख यांनी स्थायी समितीला दिला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे पालिकेमध्ये 30 वर्षे व त्याहून अधिक वर्षे सेवा करून अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होतात. सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना सेवानिवृत्तीच्या दिनांकास पेन्शन व इतर रकमा देणे बंधनकारक असतानाही प्रशासनाकडून विविध तांत्रिक कारणाने निवृत्तीचा दिनांकास पेन्शन व इतर रकमा मिळत नाही हा अनुभव आहे. सेवकाचे सेवापुस्तकातील नोंदी वेळोवेळी घेतल्यास निवृत्त होताना पेन्शन व इतर रकमा याबाबत अडचणी येत नाहीत. परंतू प्रशासनाकडून सेवापुस्तकाच्या नोंदी वेळेत न घेतल्याने पेन्शन व इतर रकमा वर्षानुवर्षे सेवकास मिळत नाही.

पर्यायाने सेवकांच्या कुटुंबाचे हाल होतात, निवृत्त झालेल्या सेवकांचे नातेवाईक महापालिकेमध्ये पेन्शन व इतर रक्कम मिळण्यासाठी फिरत असतात. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर प्रतिमहा 10 हजार रूपये प्रोव्हिजनल पेन्शन चालू करण्यात यावी असे ठरावात नमुद केले आहे. या ठरावावर स्थायीच्या पुढील बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.