Pune News : राज ठाकरे यांची पुण्यात रविवारी जाहीर सभा

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या रविवारी  (ता.22) पुण्यात जाहीर सभा पार पडणार आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी या प्रकरणी माहिती दिली. 

 

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना मुंबईतील सभेत मुन्नाभाई म्हंटले होते. त्यामुळे पुण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लांगले आहे.

राज ठाकरे यांची यापुर्वी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार होती त्यानंतर ती नदी पात्रात सभा होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र पुण्यात आलेले राज ठाकरे अचानकपणे परवा मुंबईला निघुन गेले होते त्यामुळे सभा कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र आता ही सभा रविवारी सकाळी गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी दहा वाजता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.